‘देवा घरचे ज्ञात कुणाला’ हा या ग्रंथातून प्रा.वसन्त कानेटकरांच्या ऐतिहासिक नाट्यपंचकाचाविवेचक रसस्वाद डॉ उल्हास रत्नपारखी यांनी प्रस्तुत केला आहे. प्रा. वसंत कानेटकर हे आधुनिक मराठी साहित्यातील एक सुप्रसिद्ध नाटककार. ‘रायगडालाजेव्हां जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘तुझा तू वाढवी राजा’,’जिथे गवतास भाले फुटतात’ व ‘आकाशमिठी’ ही प्रा. वसंतकानेटकरांची गाजलेली पाच ऐतिहासिक नाटके. त्यांनी इतिहास, मिथके यांचा वापर नाटकामध्ये करून त्याला काही ठिकाणी संगीताची जोड देऊन मराठी रंगभूमी १९७० च्या काळानंतर अक्षरशः गाजवली. त्यांच्या नाटकांमधून समोर येणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तीरेखांचे मानवी पातळीवरचे विश्लेषण (मनोविश्लेषण) डॉ रत्नपारखी यांनी या ग्रंथात मांडले आहे.डॉ. रत्नपारखी यांना प्रा. वसंत कानेटकर यांच्याकडून प्रत्यक्ष मराठी साहित्य शिकण्याची संधी लाभल्याने त्यांचे हे पुस्तक म्हणजे गुरूच्या ऋणातून केलेली उतराई होय. या ग्रंथास ‘वऱ्हाड’कार आणि सुप्रसिद्ध समीक्षक प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे यांची रसाळ पण टीकात्मक प्रस्तावना लाभलेली आहे.
‘Deva Gharche Dnyat Kunala’ (Who knows the Divine Design)
Dr. Ulhas Ratnaparkhi has presented the critical analysis of Prof. Vasant Kanetkar’s five historical playsin this book. Prof. Vasant Kanetkar is a well-known dramatist in modern Marathi literature. ‘Raigadala Jevha Jaag Yete’, ‘Ithe Oshalla Mrutyu’, ‘Tuj Tu Wadhavi Raja’, ‘Jithe Gavatas Bhale Futat’ and ‘Akashmithi’ are these five famous historical plays. By using history and myths and added music at some places, he made Marathi theatreextremely vibrant in1970s and 1980s. Dr. Ratnaparkhi has presented the humane elements (psychoanalysis) in these historical figures in this book. Dr. Ratnaparkhi was fortunate to learn Marathi literature directly from Prof. Vasant Kanetkar. This book is his attempt to pay tribute to his mentor. The book has a lucid but critical foreword by ‘Vrahad’ author and well-known critic Dr. Laxmanrao Deshpande.
Reviews
There are no reviews yet.